साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे कादंबरी खंड १ व खंड २ चे पुनर्मुद्रण करावे तसेच कादंबरी खंड ३ व कथा खंड ४ हे नव्याने प्रकाशित करावे, अशी मागणी महाराष्ट्रातून अनेक साहित्यिक, वाचक यांच्या कडून सातत्याने होत होती. याशिवाय अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे ऑडीओ आणि ई-बुक स्वरुपात प्रसारण करून ते डिजीटल स्वरुपात महाराष्ट्रातील सर्व वाचकांसमोर विशेषतः नव्या पिढीसमोर नेण्याचा अत्यंत आवश्यक व आधुनिक संकल्प साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीने हाती घेऊन तमाम वाचकांना व रसिकांना मोठी पर्वणी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व या समितीचा अध्यक्ष म्हणून आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निवडक वाङ्मयातील पूर्वप्रकाशित कादंबरी खंड १ व २ चे पुनर्मुद्रण तसेच खंड ३ व नव्याने प्रकाशन आणि या सर्व खंडाचे ऑडीओ व ई-बुक स्वरूपात प्रसारण करताना मला मनापासून आनंद होत आहे.
- चंद्रकांत (दादा) पाटील
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,
महाराष्ट्र शासन
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय कादंबरी खंड ३भाग २