खरं तर... माझा हा पहिला वहिला कविता संग्रह तसा मी कोणी कवी नाही, लेखक तर बिलकूल नाही. परंतु ज्या-ज्या वेळेस चांगल्या-वाईट घटना घडत असत, त्या-त्या वेळी आतल्या आत घुसमट होत असे. आणि मी प्रसंगानुरूप व्यक्त होत असे. या माझ्या व्यक्त होण्यातून झालेल्या लिखाणाच दृश्य स्वरूप म्हणजे हा `लाफिंग बुध्दा` कविता संग्रह होय असं म्हणणं वावगे ठरणार नाही. आता हे सर्व काव्य साहित्याच्या व्याख्येत कितपत बसतं आणि सूज्ञ वाचक याला साहित्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या स्तरावर ठेवतील हे सर्व येणारा काळच ठरवेल.
तसा माझा जन्म चेंबूर, मुंबई येथे झाला. बालपण घाटकोपर येथे गेले. इयत्ता पाचवी नंतर माझ्या वडिलांची बदली अंधेरी, सहार गांव येथे झाल्यामुळे वडिलांना सहार गांव येथील कामगार वसाहतीमध्ये रूम मिळाली. वडील पी.डब्लू.डी. खात्यामध्ये कामगार म्हणून सेवेत होते. इयत्ता सातवीपर्यंत आमचं वास्तव्य तिथेच होतं. तिथे जातीयता म्हणजे काय हे मला अजिबात माहीत नव्हते.
-राजेंद्र झेंडे (मनोगत)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : लाफिंग बुद्धा