डॉ अशोक इंगळे यांचे `कलासंस्कृतीचे उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर` हे छोटेखानी पुस्तक म्हणजे डॉ आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वातील कलाभिरूची ठळकपणे अधोरेखित करणारे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संगीत, विनोद, नाटक, चित्रपट, लोककला, जलसे अशा सान्याच कलाविष्काराबद्दत वेगवेगळ्या प्रसंगी व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या व्यापक वैचारिक विश्वात कलाभिव्यक्तीचे स्थान अल्पसे व प्रासंगिक असले तरी ते दलित, उपेक्षितांसह सान्याच बहुजनांच्या कलाविष्काराला नवी सौंदर्य आणि समाजशास्त्रीय दृष्टी प्रदान करते, शिवाय त्यांच्यामध्ये एक सांस्कृतिक उमेदही जागवते. कलेच्या विविधांगी क्षेत्रात आवडीने हस्तक्षेप करणाऱ्या या महान कला उपासकाच्या अनोख्या सौंदर्यदृष्टीचा आगळावेगळा वेध डॉ. इंगळे यांनी या लेखनातून घेतला आहे. त्यामुळे त्यांचे हे लेखन अनेकार्थाने वेगळे ठरते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कलेविषयीच्या दृष्टीकोनाला यानिमित्ताने डॉ. इंगळे यांनी मोठ्या परिश्रमाने प्रकाशात आणले आहे. म्हणून या पुस्तकाचे रसिक वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
-डॉ. मिलिंद कसबे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कालासंस्कृतीचे उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर