या प्रवासात मला वेगवेगळी ठिकाण विशेष भावायची त्यातलं एक म्हणजे आंबोली धवधवा आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्हयातील सहयादीच्या रांगामधले निसर्गरम्य गाव है उसे थंड हवेचे ठिकाण तसेच जास्त पावसाचेही आंबोली घाटमार्गे मी गोव्याला जायचो. जाताना आणि पुन्हा येताना घाटात धावणे हे नेहमीचेच प्रत्येकवेळी मला आंबोली धबधबा विलक्षण भासायचा. आई आणि सीमा रात्री तीन वाजता उठून मला चपाती भाजी करुन दयायच्या मी चहा घेऊन बाहेर पडायचो जवळ जवळ अंधारातच माझ्या प्रवासाला सुरवात होई आंबोली है। ठिकाण माझ्या गावापासून जवळपास ८० किलोमीटरवर असेल साडेसहा पर्यंत मी तेथे पोहचत असे थोडेसे उजाडलेले असायचे, त्यावेळी मी आणि तो धबधबा आम्ही दोघंच समोरासमोर असायचो. आजही आठवतय, पावसाळा सुरू होता त्यामुळे धबधबा शुभ पाण्याने कोसळत होता त्याच्या वाहत्या गार पाण्यात भी तौड़ धुवायचो आणि तहानही भागवायचो. त्या पाण्याच्या स्पर्शाने तहान भागल्याचा स्वर्गीय आनंद मिळायचा त्या पाण्यासारखं स्वच्छ पाणी क्वचितच प्यायला मिळतय तिथला आजूबाजूचा परिसर मला फार बोलका वाटायचा. धबधब्याचा आवाज त्या परिसरात भरून जायचा आजूबाजूचे जंगल हिरवगार झालेल असायच ढग जणू त्या धबधब्याच पाणी भरायला तिथ येऊन यावतात असा भास व्हायचां.
- सागर डवरी
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आंबोली धबधबा माझ्या प्रवासातलं विश्रांतीच आणि विरंगुळ्याचं ठिकाण... !