किरण बेदी यांचा जन्म अमृतसर येथे ९ जून १९४९ साली झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पद्याची पदवी घेतली. आयआयटी दिल्ली या ठिकाणाहून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली पोलीस दलातील त्या पहिल्या आयपीएस अधिकारी. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जे जे काम केले ते अनन्यसाधारण असे होते. कायमच त्यांनी नवनवीन आव्हाने स्वीकारली आणि जेथे जेथे त्या गेल्या तेथील अडचणी जाणून घेऊन प्रसंगी त्या प्रवाहाविरुद्ध देखील जाऊन योग्य ते निर्णय घ्यावाला कधीच डगमगल्या नाहीत. गुन्हेगारी नियंत्रणाचे काम त्यांनी केले. त्यांनी त्यांची तत्वे कधीच सोडली नाहीत. पोलीस खात्यात असूनही प्रामाणिकपणे, माणुसकीने संवेदनशीलता जपनी नी एकूणच सुधार कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीत दाखविलेले धाडस, त्यांनी केलेले काम घेतलेले निर्णय पाहून आजच्या काळातील ही सावित्रीच आहे हे जाणवते.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आजची सावित्री : किरण बेदी एक अतुलनीय शौर्यगाथा