आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यात मदनपल्ली या गावी जिद्दू कृष्णमूर्ती यांचा जन्म १९ मे १८९५ रोजी झाला. जगातील अनेक विचारवंत व तत्ववेत्त्यांपैकी एक. त्यांनी जीवनविषयक विचार अभिव्यक्त केले. स्वतंत्र विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव प्रेम` हा कृष्णजींच्या विचारांचा आत्मा, भीती, लोभ, वासना, क्रोध, हिंसा या भावनांचा ते शोध घ्यायला सांगतात. कृष्णमूर्ती मुक्त शिक्षणाचा आग्रह धरतात. पदव्यांच्या ओझ्याने दबून न जाता शिक्षणामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडविणारे व जगावे कसे? हे शिकविणारे खरे शिक्षण असे त्यांचे मत आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जे. कृष्णमूर्ती यांचा जीवनविषयक दृष्टीकोन