एकीकडे पाश्चात्त्य जग शक्तिशाली महानायकांच्या शोधात थोड्या थोड्या वर्षांनी नवनवीन महानायक निर्माण करत असताना, पूर्वेकडचं जग मात्र आपल्या पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या महानायकांवरच संतुष्ट आहे. या सर्व महानायकांमधला नायक म्हणजे चिरतरुण हनुमान. त्याच्या कथांनी शतकांनुशतकं आपली करमणूक केली आहे आणि आपल्या संस्कृतीवर संस्कारही केले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हनुमानाच्या कथांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, या कथांच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्यांचं आधुनिक पद्धतीनं सादरीकरण करण्याचा प्रयत्न अजूनही झाला नाही. हनुमान : एक महानायक` हे पुस्तक आपल्यापर्यंत हनुमानाच्या गोष्टी आधुनिक शैलीमध्ये पोहोचवत, तुमची करमणूक करत नावीन्यपूर्ण पद्धतीनं माहिती देईल, याची खात्री आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं हनुमानाच्या भारतीय पुराणांमधून आणि लोककथांमधून हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या अनेक कथा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. काळाच्या ओघात आधुनिक वाचक त्यांपासून काहीसे दूर गेले आहेत. वाल्मीकी ऋषींनी चितारलेल्या हनुमानाच्या व्यक्तिरेखेशी तात्त्विक साधर्म्य जोडणाऱ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. ज्या कथा तसे तात्त्विक साधर्म्य साधणाऱ्या नव्हत्या, त्यांना मात्र काळजीपूर्वक वगळून हनुमानाच्या व्यक्तिमत्त्वाचं देवत्व जपण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : हनुमान एक महानायक