दोन हजार तेरा सालच्या भर दिवाळीत आम्ही दक्षिण भारताची कौटुंबिक सहल केली. एक ते नऊ नोव्हेंबर या नऊ दिवसात सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास केला. धनत्रयोदशीला पहाटी घराबाहेर पडलो आणि कार्तिक शुद्ध षष्ठीला पुन्हा घरी परतलो. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांतून मंडलाकृती मागनि हमीदच्या गाडीतून प्रवास झाला. गेल्या वीस वर्षांपासून आमच्या कौटुंबिक सहलीना हमीदची साथ असते. आम्ही पतिपत्नी, गवदि कुटुंबातील अशोकराव, रंजनाताई आणि प्राची तसेच कैलास आणि सुशीला हे जोडपं असा सातजणांचा प्रवासी गट होता. दिवाळीच्या सणालाच घर, मुले, माणसे यातून बाहेर पडताना काहीसं अवघडल्यासारखं वाटत होतं. नियोजनाप्रमाणे प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाला, पण सहल खऱ्या अर्थाने सुरू झाली ती कर्नाटकातील हावेरीपासून. सहलीची सांगताही कर्नाटकातल्या बसवकल्याणला झाली. आठ- नऊ दिवस मजेत गेले. दैनंदिन व्यापातून दूर झाल्यावर मिळतो तो निवांत लाभला. या काळात सहीशिवाय दुसरा विषय जवळपास समोर नव्हताच. ही खरीखुरी आठवड्याभराची आनंदयात्रा होती. पुढील बराचकाळ आपापले काम उत्साहाने करण्यासाठी तिने आम्हाला नवी ऊर्जा पुरविली. आजही या सहलीच्या लहान-मोठ्या संस्मरणीय आठवणी मनात घोळतात आणि एक हवीहवीशी वाटणारी हुरहूर दाटून येते. दक्षिण प्रवासातून मिळालेली ही `आनंद दक्षिणा` शब्दबद्ध करून ती आता वाचकांच्या स्वाधीन करीत आहे. वाचकांनाही ती आवडेल असे वाटते.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : प्रवास दक्षिणा