राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकर यांना `पुनर्जागृत झालेल्या भारताचे प्रेषित`, `एक संत`, `एक नवे विवेकानंद`, `भारतमातेचे सर्वश्रेष्ठ सुपुत्र` आणि `विसाव्या शतकातील हिंदू समाजाला मिळालेले सर्वात मोठे वरदान` या रूपांत प्रस्थापित करू पाहात आहे. त्याचे आपण साक्षीदार आहोत. वास्तविक जातिवाद, वंशवाद आणि साम्राज्यवादावर अंतःस्थ विश्वास असलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्येला त्यांनी आपले जीवन वाहून घेतले होते आणि तरीही त्यांचा अशा स्वरूपात प्रचार केला जात आहे. ज्या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांसारखे अल्पसंख्य लोक केवळ दुय्यम नागरिक म्हणूनच राहू शकले असते आणि जिथे शीख, जैन आणि बौद्ध धर्मांना फक्त हिंदू धर्माचा एक भाग म्हणून मान्यता मिळू शकली असती अशा प्रकारचे हिंदू राष्ट्र भारतात असावे या भूमिकेचे ते समर्थक होते... लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि समतेचे तत्त्व धारण करणाऱ्या भारताच्या विरोधातील एक ताकदवान संघटना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आरएसएस ही संघटना पुढे आली. याच कारणामुळे संघाने सर्व प्रकारे दबाव आणूनही संघाच्या दोन वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार (१९९८-२००४) गोळवलकरांना `भारत रत्न`ची उपाधी देऊ शकले नाही.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : गोळवलकरवाद : एक अभ्यास