अभिनय हा जीवनाचा अविभाज्य भाग
मनुष्य जीवनामध्ये प्रवास करताना त्याला अनेक भूमिका साकार कराव्या लागतात. कामाचे क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये सुप्त स्वरूपात अभिनय असतोच. जर यदा कदाचित एखाद्याने जाणीवपूर्वक अभिनयाचा अभ्यास केला आणि त्याचा उपयोग आपल्या कार्यामध्ये केला तर त्याचं कार्य अधिक उठावदार दिसून येईल. प्रथमतः व्यक्तिगत, प्रापंचिक जीवनातही प्रत्येकाला मुलाची, वडिलांची, आईची, आजी-आजोबांची, भाऊ-बहिणीची म्हणजेच अनेक नात्यांच्या भूमिका साकार कराव्या लागतात. या भूमिका पार पाडताना जर त्याला त्या भूमिकेचे आदर्श ज्ञान आणि त्या जोडीला अभिनय असेल तर त्याचे संसारिक जीवन यशस्वी होण्यास मदत होईल. उदा. `नटसम्राट` या नाटकातील भूमिका व संवाद पाहिल्यानंतर भावनांची व त्या नात्यांची जाणीव व बोध निश्चित स्वरूपाने घेता येईल.
अगदी व्यावसायिक जीवनामध्ये मग तो शिक्षक, राजकीय नेता, शेतकरी, व्यवस्थापक असो अशा कोणत्याही क्षेत्रात काम करताना त्याने व्यक्त होताना जर अभिनय आपल्या कार्यात उतरवला तर लोकांपर्यंत त्याचे कार्य प्रभावीपणे पोहोचू शकेल. उदा. शिक्षकांनी डोळ्यांच्या, हाताच्या, आवाजाचा चढउतार या माध्यमांचा मुलांना शिकवताना प्रयोग केला तर स्वतःचा विषय अधिक फुलवता येईल.
लोकांशी ज्याला प्रभावी संवाद साधवायचा असेल मग तो व्याख्यानाच्या माध्यमातून असो किंवा अन्य कोणत्याही अशावेळी म्हणी, वाकप्रचार, श्लोक, अभंग इत्यादींचा उपयोग केला तर त्याचे म्हणणे अधिक अचूक व परिणामकारकरीत्या लोकांपर्यंत जाईल व त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित होईल.
यास्तव मा. श्री. मकरंद अनासपुरे हे एक रसायन तरुणांसाठी प्रेरणादायी असेल.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मकरंद बोले म्हण चाले...