Book Name : bruhat bharat
- Category: Literature
- Author: आ.श्री.केतकर
- Publisher: चिनार पब्लिशर
- Copyright By: चिनार पब्लिशर
- ISBN No.: 81-87520-91-4
1 Book In Stock
हे पुस्तक अनेक प्रकाशित आणि अप्रकाशित वैविध्यपूर्ण संदर्भ यांचा वापर करून लिहिले असले, तरी ते या विषयाच्या व्यासंगाचे नसून खोलवर केलेल्या विचारांचे प्रतीक आहे. खासदार या नात्याने अतिशय व्यग्र असतानाही अनेक पूर्वनियोजित कामांतून वेळ काढून आपले वैयक्तिक संशोधन सुरूच ठेवून मी हे लेखन केले आहे. म्हणूनच मी जाणीवपूर्वक याचे स्वरूप विस्तृत निबंधाचे ठेवले आहे, त्यामुळे तळटीपा आणि इतर संदर्भ साहित्याला रजा देण्यात आली आहे. तरीही, ज्या मोजक्या पुस्तकांची यादी ग्रंथसूचीमध्ये दिली आहे, त्या पुस्तकांमध्ये या पुस्तकातील बहुतेक अवतरणे सापडतील. माझ्या राजनैतिक व्यवसायातील आणि त्याबाहेरील अनेक मित्रांनी या पुस्तकात विश्लेषण केलेल्या विषयांची समज मला येण्यासाठी (अनेकदा नकळतच) मदत केली आहे. त्यांपैकी माझे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सहकारी संदीप चक्रवर्ती आणि माझ्या `ऑप-एड पाना`वरील लिखाणात मला अधूनमधून मदत करणारे कीर्तिक शशिधरन या दोघांचा त्यांनी केलेल्या बहुमोल सूचनांसाठी मुद्दाम उल्लेख करीन. माझा मुलगा कनिष्क थरूर आणि माझे स्नेही विराट भाटिया आणि अरुण कुमार यांनी या पुस्तकातील विशिष्ट भागावर आपली टिप्पणी केली, त्याचप्रमाणे माझे संपादक, पेंग्विनचे जयश्री राम मोहन आणि उदयन मित्र यांचा मी ऋणी आहे.