पुस्तकाचे नाव : साद मनाची...
- Category: Literature
- Author: नवनाथ ज. शेळके
- Publisher: सनय प्रकाशन
- Copyright By: नवनाथ ज. शेळके
- ISBN No.: 978-93-84600-23-5
₹125
₹140
5 Book In Stock
Qty:
माणसाचे जीवन अनेक चढ उतारने भरलेले आहे. त्यात कधी सुख, तर कधी दुःख माणूस भोगत असतो. पण माणसाचा अधिक काळ हा दुःख, संघर्ष यातच जातो. संघर्षा शिवाय जीवनाला सुध्दा काहीही अर्थ नाही. संघर्ष करत, लढत माणूस आपल्या जीवनाला आकार देतो. या आकार देण्यात महत्त्वाची भूमिका निभावते ती नैतिकता. नैतिकतेच्या बळावर जीवनाची नौका काठावर पोहचते. हिच नैतिकता सांभाळत आणि जगत मला सुध्दा अनेक प्रश्न पडत गेले. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात अनेक दिवस खर्ची गेले. मग मनानेच मनाला `साद` घातली आणि त्याची उत्तरे माझ्या कवितेतून कागदावर उतरु लागली. छळणारे प्रसंग, दुःख आणि संघर्ष यांना मोकळे करण्यासाठी शोधलेली वाट म्हणजे "साद मनाची".