पुस्तकाचे नाव : बुद्धांचे मंगलसुत्त
- Category: Literature
- Author: डॉ. आ. ह. साळुंखे
- Publisher: लोकायत प्रकाशन
- Copyright By: राकेश आ. साळुंखे
- ISBN No.: 978-93-84091-03-3
1 Book In Stock
प्रत्येकाचे जीवन जास्तीत जास्त सुरक्षित, दुःखमुक्त आणि आनंदमय व्हावे, अशी तळमळ बुद्धांच्या मनात सदैव वसत होती. त्यांनी पंचेचाळीस वर्षे चारिका केली, ती प्रत्येकाचे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन मांगल्याने ओतप्रोत भरून जावे, या उद्देशानेच ! माणसाने कोणते आचरण केले असता त्याला पराजयाचा वा ऱ्हासाचा क्लेशकारक अनुभव घ्यावा लागणार नाही, हे कळावे म्हणून त्यांनी मंगलसुत्ताचा उपदेश केला. प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या ओळखाव्या, कर्तव्ये पार पाडावी, सद्गुण आत्मसात करावेत, हा त्यांचा उपदेश होता. सध्याच्या बदलत्या जगामध्ये, स्वागतार्ह अशी भौतिक प्रगती होत असताना, दुसऱ्या बाजूने माणसे मात्र एकमेकांना दुरावू लागली आहेत. कुटुंबांची घडी विस्कटू लागली आहे. निखळ मैत्रीची जागा स्वार्थी व्यवहाराने घेतल्याची उदाहरणे वाढत आहेत. खूप जण व्यसनांच्या कचाट्यात सापडून उद्ध्वस्त होत आहेत. गरजेपेक्षा किती तरी जास्त मिळाल्यानंतरही माणसांची मने अतृप्त, असमाधानी, अस्वस्थ, बेचैन आहेत.