पुस्तकाचे नाव : वंचितांचे वर्तमान
- Category: Literature
- Author: सुखदेव थोरात
- Publisher: लोकवाङ्मय गृह
- Copyright By: सुखदेव थोरात
- ISBN No.: 978-93-82906-76-6
1 Book In Stock
दलित-आदिवासी, नवबौद्ध यांसारखे धार्मिक व सामाजिक समाजगट इतरांपेक्षा अधिक गरीब व वंचित का आहेत याचे या पुस्तकात परीक्षण केले आहे. हे पुस्तक दर्शविते की जमीन व व्यवसाय यासारख्या प्रतिव्यक्ती उत्पन्न देणाऱ्या उत्पन्नाच्या साधनांचा - त्यांच्या मालकींचा अभाव हे गरिबी व वंचिततेचे मुख्य कारण आहे. नैमित्तिक मजुरी मिळणाऱ्या मजुरांची उच्च बेरोजगारी हे सुद्धा कारण आहे. पुस्तक हे निदर्शनास आणते की दलितांसोबत जातीय-आर्थिक व सामाजिक भेदभाव केला जातो म्हणून त्यांची गरिबी सर्वाधिक आहे. म्हणूनच हे पुस्तक राज्यातील गरिबी व वंचिततेच्या प्रश्नाच्या केन्द्रस्थानी थेट पोहोचते. याशिवाय ते वंचित व विशेष करून दलितांच्या सामाजिक व राजकीय चळवळीवर प्रकाश टाकते. हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. ज्यांत महाराष्ट्रातील दलित-वंचित समाजाच्या मानवी विकासासंबंधीचे अद्यावत आकडेवारीच्या आधारावर केले आहे. हे पुस्तक शासनातील धोरणकर्ते, संशोधक, विद्यार्थी, चळवळीतील कार्यकर्ते व या प्रश्नांशी संवेदनशील असलेल्या लोकांना उपयुक्त ठरेल.