पुस्तकाचे नाव : मराठी दलित एकांकिका
- Category: Literature
- Author: दत्ता भगत
- Publisher: साहित्य अकादेमी
- Copyright By: Sahitya Academi
- ISBN No.: 978-81-260-2969-3
0 Book In Stock
दलित रंगभूमीची चळवळ महाराष्ट्रात १९४० नंतर उदयाला येते. या रंगभूमीवरील सुरवातीचे लेखन `जलसा` या आगळ्या वेगळ्या तंत्राचे आहे. मराठी मध्यवर्ती रंगभूमीचे सुवर्णयुग चालू होते त्याच वेळी `जलसा` उदयाला आला. `जलसा` या सादरी- करणाचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची. चळवळ होती. पुढे स्वातंत्र्यानंतर आंबेडकरी विचाराने दलित रंगभूमीची अत्यंत सकस चळवळ निर्माण केली. मध्यवर्ती मराठी रंगभूमीला या रंगभूमीची दखल घेणे भाग पडले. गावकुसा- बाहेरच्या व्यथा-वेदनांचा रंगाविष्कार रंगभूमीवर आला आणि मराठी रंगभूमी अधिक समृद्ध झाली. दलित रंगभूमीच्या चळवळीमुळे वसाहतोत्तर काळात मराठी रंगभूमीवरचा हा विद्रोही प्रवाह शब्दरूपाने कसकसा विकसीत होत गेला याची अभ्यास सामग्री म्हणजे हे संपादन होय. तसेच सदर संपादन भारतीय भाषांमध्ये १९६० ते २००० या चार दशकात काय नवे घडते आहे याची तुलना करता यावी यासाठी तर अत्यंत उपयोगी आहेच. पण `भारतीय रंगभूमी` या संकल्पनेला या लेखनाचे सादरीकरण झाल्यास काहीशी स्पष्टता येईल याची खात्री वाटते.