सध्यस्थितीत आजू बाजूला बघतांना, अवती-भोवती निरिक्षण करतांना काही प्रमाणात निराशाजनक, नाऊमेद करणारी, प्रसंगी खचून जाण्यास भाग पाडणारी परस्थिती आहे. तंत्रज्ञानाचा वाढत असलेला अविवेकी, उन्मादी, अंदाधुंद वापर. त्यातून निर्माण होणारे विविध जटील प्रश्न समस्या, गुंतागुंत, नैराश्य वाढविणाऱ्या आहेत. विशेषत: सध्याच्या इंस्टंटच्या जमान्यात बरीच तरूणाई आणि काही कुटुंबेसुद्धा नैराश्येच्या विळख्यात सापडलेली दिसतात. कुणी परीक्षेतील अपयशाने, नोकरी-काम-धंदा न मिळाल्यामुळे, कधी-कधी विविध कोरोनासारख्या महामारीच्या कारणामुळे अथवा कधी विविध व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे, कौटुंबिक कलह, ताण-तणाव ह्यामुळे नैराश्यग्रस्त, नाऊमेद झालेले दिसतात. सर्व सुख-सुविधा, अनुकुलता बऱ्यापैकी उपलब्ध असूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आलेले हे नैराश्य झटकून टाकण्यासाठी, त्यांच्यातील वैचारिक, मानसिक बकालपण नष्ट करण्यासाठी किमान ते कमी करण्यासाठी ह्या प्रेरणादायी बोधकथांची आवश्यकता आहे. ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन हे गुगलच्या माध्यमातून होईलही पण जीवन मूल्यांचं संवर्धन आणि व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी डिजिटल, फिजिकल आणि प्रेरणादायी बोधकथांची भविष्यात गरज भासणार आहे. ते भागविण्याचं सामर्थ्य ह्या प्रेरणादायी बोधकथांमध्ये निश्चित आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : प्रेरणादायी बोधकथा