तात्यासाहेब गुंजाळ यांचे हे आत्मचरित्र का वाचायचे ? असा प्रश्न आजच्या पिढीसमोर पडण्याची शक्यता आहे. या आत्मचरित्रातला शब्द न् शब्द सच्चा आहे. एक करारी, स्वाभिमानी आणि मेहनती मराठी माणूस आपलं व्यावसायिक आयुष्य किती उंचीवर नेऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे आत्मचरित्र आहे. गेल्या पंचवीस वर्षांत जागतिकीकरणाच्या आगमनाने खाजगी करणाचा विळखा घट्ट झाला आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्या धुसर होत असताना तात्यासाहेब गुंजाळ आपल्या अनुभवातून युवकांना उद्योग-व्यापार करण्याचा जो मूलमंत्र देतात... तो आजच्या घडीला फार महत्त्वाचा आहे. अनुभव, सच्चाई आणि साधेपणा यांचा सुरेख संगम तात्यासाहेब गुंजाळ यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. म्हणून या पुस्तकातले अनेक अनुभव आजच्या तरुण पिढीला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत...(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जयहिंद