"KARKARE IS NO MORE" असे आम्ही २६/११/२००८ रोजी रात्री टीव्ही वरील FOOTAGE वाचले व मनापासून हादरलो. ताबडतोब सर्व टीव्ही चॅनेल बघायला सुरुवात केली. त्यांच्यावरील त्या अगोदर सर्व प्रसार माध्यमातून होणारी टिका नजरेसमोर आल्याशिवाय राहिली नाही. आमच्या अनुभवातून करकरेंना आरएसएस व त्यांच्याशी संलग्न संस्थाशिवाय कुणी मारुच शकत नाही, अशी आमची खरोखर खात्री पटली. मिनिटांचाही उशीर न लावता तशी आम्ही प्रसिद्धीसाठी एक प्रेस नोट काढली ती ई-मेल द्वारे लगेच प्रसिद्धीसाठी दिलीदेखील. मात्र ती छापली तर कुणीच नाही. परंतु आम्ही वारकरी वर्गाला बरोबर घेऊन डाऊ केमिकल या परदेशी कंपनीविरुद्ध करीत असलेल्या आंदोलनात, वारकरी आमच्यावर भडकविण्यासाठी वापरली. श्री. मुश्रीफ तसे आमचे जुने पण जुजबी मित्र, पण "करकरेंना कुणी व का मारले?" या विषयाने आम्हाला अधिकच एकत्र आणले. तपास यंत्रणेचा त्यांचा प्रचंड अनुभव व आमचा फौजदारी खटले चालविण्याचा व न्यायदानाचा अनुभव अशी आमची या निमित्ताने खास मैत्री जमली. महात्मा गांधींच्या खुनापेक्षाही क्रूर कट या संघटनांनी केल्याचे आमच्या लक्षात आले व तो घडला तसेच देशांपुढे प्रामाणिकपणे मांडण्यासाठी मुश्रीफांच्या अविरत मेहनतीचा व अनुभवाचा कस लागला. खरं काय ते शोधण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाचं कौतुक करावं तेवढं थोडच. विरोधक फक्त दुरुनच खिल्ली उडवताना दिसतात. ते कधीच समोरासमोर येऊन चर्चा करायला तयार झाले नाहीत. अनेक प्रकारे सल्ला घेऊन अनेक स्तरांवर कोर्टात जाऊन न्यायाच्या सर्व अपेक्षाही फोल ठरल्यात. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही हा विषय अत्यंत सोप्या व सामान्यांच्या भाषेत वाचकांपुढे ठेवीत आहोत.
न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : करकरेंना कोणी व का मारले?