आज आदिवासी कला म्हटलं की, डोळ्यांसमोर वारली चित्रं येतात पण ती चित्रं मुळात त्यांच्या एतद्देशीय संदर्भापासून तोडली गेली आहेत. आज ती व्यापारीकरणातून केवळ नक्षीकाम बनली आहेत आणि त्यांचे एतद्देशीयपण चादरी आणि कपडे खपवण्याच्या कामी लागले आहे.
या चित्रांचा मूळ एतद्देशीय संदर्भ आहे कथांचा. ही चित्रं मुळात कथाकथनाची साधनं होती. गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया ती काढत. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपद्धती चित्रित होत होती. त्या समाजातून बहरलेलं तत्त्वज्ञान त्यात सापडतं, जीवनाचा सह-आनंद लुटलेला सापडतो, निसर्गावरचं प्राणिमात्रांवरचं प्रेम आणि निसर्गाप्रती कृतज्ञता सापडते, एक विलक्षण मोकळेपणा सापडतो.
भारतीय संस्कृतीतला विविधपणा, चैतन्य अनुभवायचं तर उत्खननाची नाही, तर उघड्या काना डोळ्यांनी आणि मोकळ्या मनानं आपला भोवतालच ऐकायची, पाहायची आणि सहृदयतेनं विचार करायची गरज आहे. निसर्गाच्या सान्निध्यात उमलेलं हे ज्ञान मग परकं राहणार नाही.
ही गरज कष्टकरी संघटनेच्या प्रदीप प्रभू आणि
शिराझ बलसारा यांनी ओळखली आणि गावागावांतून
त्यांनी आणि त्यांच्या कार्यकत्यांनी या वारली कथा गोळा
केल्या व इंग्रजीत ग्रथित केल्या. त्यांतील पंधरा निवडक
कथांचं मराठी वाचकांसाठी पुनर्कथन केलं आहे
सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा यांनी.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आदिवासी बोधकथा