पुस्तकाचे नाव : थोडंसं वेगळ
- Category: Unseen Stories
- Author: उत्तम कांबळे
- Publisher: मनोविकास प्रकाशन
- Copyright By: उत्तम कांबळे
- ISBN No.: 978-93-80264-50-9
                                                                                        ₹90
                                            
                                                ₹100
                                            
                                                                                    
                                      
                                    1 Book In Stock
                                                    Qty: 
                                                    
                                                    
                                                
                                                
                                                
                                                
                                                
                                                
                                            प्रिय दादा तथा सुधाकर जपे, अठरा ऑक्टोबर २००१ ची ती सकाळ... शशिकांत जगताप यांच्या कट्ट्यावर मी बसलो होतो. स्कूटरवरून तुम्ही घरी निघाला होता. मला पाहून तुम्ही मागे परतलात. नेहमीप्रमाणे खूप गप्पा केल्या. माझ्या लेखनातील अधिक-उणेही सांगितलं. सकाळमधून प्रसिद्ध होत असलेल्या `सारांश` या सदरातील व गेल्या काही दिवसांत मी लिहिलेल्या अशाच स्वरूपाच्या मजकुराचं पुस्तक व्हावं असं सांगून तुम्ही उठलात. स्कूटरला किक मारली. निघून गेलात. सायंकाळी तुमच्या निधनाचीच बातमी जगतापांनी दिली. तुमच्या जाण्याचं सर्वांनाच दु:ख झालं. तुम्ही मला सांगितलेल्या वाक्यानं मी आणखी अस्वस्थ झालो. हे पुस्तक तुम्हाला अर्पण करताना मला आनंदही होतो आहे आणि माझी अस्वस्थताही कमी होते आहे. - उत्तम कांबळे
 
                             
      
     
      
     
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                        
                                         
                                       