८ मे १९६८ सालची गोष्ट आहे ही. संसद भवनात बाबू जगजीवनराम म्हणाले की, `प्राचीन काळी भारतात हिंदू गोमांस खात होते.` हे ऐकून हिंदू ओरडून उठले, `हिंदू गाईचे मांस खात होते असे कसे म्हणता येईल ?` मग यावर गरमागरम चर्चा झाली. अनेक हिंदू लेखकच नव्हे तर, खुद्द ब्राह्मणांनीही मान्य केले आहे की, प्राचीन काळी भारतात हिंदुंच्या चारही वर्णांचे लोक गोमांस खात होते. इतकेच नव्हे तर ब्राह्मण सर्वाधिक मांसभक्षक होते. मांस भक्षणात गाईच्या मांसाचेच प्रमाण सर्वाधिक असे त्यातही गाईचे मांस ब्राह्मण लोक मोठ्या आवडीने खात असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या `द अनटचेबल्स` या पुस्तकात लिहिले आहे की, `प्राचीन भारतात ब्राह्मण व ब्राह्मणेतर दोघेही मांस खात असत.` याविषयी त्यांनी एक संपूर्ण प्रकरणच लिहिले आहे.गो-रक्षणाचा पुळका असणाऱ्या धर्माच्या या धंदेबाजांनी गो-रक्षणाच्या पडद्यामागे आपला राजनैतिक फायदा करून घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी गो-रक्षणाच्या नावाने उपोषणे आणि चळवळी सुरु केल्या. विनोबा भावेंसारख्या लोकांचा हा एकसूत्री कार्यक्रम एक उद्योगच बनलेला होता. गो-रक्षण विषयक चळवळ चालू ठेवावी आणि तिच्याच मदतीने आयुष्यभर आत्मप्रचार व धार्मिक राजनीती करीत रहावे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण