दीपावलीच्या सुमुहूर्तावर माझी दुसरी कादंबरी `मिस्टरी ऑफ डिमेटर` प्रसिद्ध होत आहे, याचा मला खूप आनंद होतोय. माझी पहिली कादंबरी `अमात्य हेग्रीस मलयकेशीराज`, याचे प्रकाशन महाराष्ट्रभूषण श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि जेष्ठ साहित्यिक श्री. न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तेही दिवाळीतच. हा योगायोगच म्हणावा लागेल. या कादंबरीचं वाचकांनी उदंड स्वागत केल्यामुळे माझी पहिली आवृत्ती कमी वेळातच संपल्यानं `अमात्य हेग्रीस मलयकेशीराज` ची दुसरी आवृत्तीही याचबरोबर प्रसिद्ध होत आहे, हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.कॉलेजमध्ये शिकत असताना हिस्टरी ऑफ आर्किटेक्चर या विषयात मी जास्त रमायचो. त्यातल्यात्यात सर बॅनिस्टर फ्लेचर लिखित ग्रीक हिस्ट्रीतील प्रकरणे मला फार आकर्षित करायची. ग्रीक टेम्पल्स, डोरिक, आयोनिक व कॉरंथाईन ऑर्डर्स, अथेन्समधील एक्रोपोलीस टेम्पल्सचा समूह याचं मला खूप आकर्षण असायचं. पुढे ग्रीक देवता व त्यांच्या गूढ दंतकथा खूप आवडायला लागल्या. तुर्कस्तान, इजिप्त मधील स्थळ वर्णनांच्या विश्वात मी हरवून जायचो. क्लिओपात्रा चित्रपटातील अलेक्झांड्रिया नगराच्या दृश्यांनी मी खूप भारावून गेलो. इजिप्तमधील सायनाय हिल्स, सुवेज कॅनॉल याची वर्णने आवडायची. इस्तंबूल मधील येरेबातान सार्नीची भूमिगत जलसाठा, गुलाबी अय्या सोफिया, इस्तिकलाल कादेसी रोड यांची वर्णने माझ्या मनात घर करून होती. या सर्वांना एका काल्पनिक कथासूत्रात गोवून मी या कादंबरी लेखनाची सुरुवात केली.या कादंबरीच्या प्रकाशनासाठी अक्षरधारा बुक गॅलरीचे श्री. रमेश राठीवडेकर यांची मला मोलाची मदत झाली. माझे मित्र श्री. मनीष अष्टेकर सराफ यांनी मला प्रोत्साहन दिले. या दोघांचे मी आभार मानतो. कादंबरीला अतिशय समर्पक प्रस्तावना दिल्याबद्दल मी श्री. अजित ठाकूर यांचे आभार मानतो. कादंबरीचे मुखपृष्ठ माझे जावई श्री. विवेक देशपांडे यांनी अतिशय सुंदर आणि आपुलकीने करून दिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मुद्रित शोधनाचे काम श्री. विजय काचरे सर यांनी केले. त्यांचेही मी आभार मानतो. या कामात ज्यांनी ज्यांनी मला मदत केलेली आहे, त्यांचा मी आभारी आहे.
- शरद जतकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : दि मिस्टरी ऑफ डिमेटर