डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांवर आधारित आदर्श समाज निर्मितीचा विचार वृद्धिंगत व्हायला हवा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात सर्वांना सुलभ जीवन जगायचे असेल तर पाणी, उपजीविका आणि विवेकासाठी पाणी समान प्रमाणात हवे. नद्या, तलाव, धरणे, विहिरी यातील पाणी बऱ्याचवेळी विषम प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे पाण्यासाठी वाद होतात. संघर्ष होतात. यासाठी जलव्यवस्थापन, नियोजन, कार्यान्वयन आणि वितरणव्यवस्था प्रभावी करणे गरजेचे आहे. पाणी नैसर्गिक संपत्ती आहे. त्यावर प्रत्येकाचा अधिकार आहे. यासाठी जलसाठ्यांचे राष्ट्रियीकरण, नद्यांचे व नदीखोऱ्यांचे पाणी समप्रमाणात वापरात यावे. एकूण जलसृष्टी समजून घ्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जलसमाजवाद समजून घेतला तर बऱ्याच गोष्टी सुलभ होतील. देशातील महापूर, जलप्रलय, जलसंवर्धन, व्यवस्थापन, पूरनियंत्रण, शेती व नदी खोरे विकास, रोजगार इत्यादी अनेक प्रश्न सुटू शकतील.
नैसर्गिक संसाधनामध्ये जल, जंगल, जमीन, जनावरे आणि जैवविविधता या सर्वांचे समन्यायी वाटप व्हावे अशी कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. ती समजून घ्यायला हवी. डॉ. आंबेडकरांचे जलसंस्कृती व जलसमाजवाद समजून घेण्यासाठी प्रस्तूत ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल. "
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भारतीय जलसंस्कृती आणि डॉ. आंबेडकरांचा जलसमाजवाद