फ्यूडॅलिझमविरोधी वा सरंजामशाहीविरोधी त्या देशाची भांडवलदारी लोकशाही क्रांती म्हणजे त्याच्या उत्पादनात कल्पनातीत वाढीपासून सर्व भौतिक व वैचारिक क्षेत्रांत कायाकल्प असा अर्थ घेतला जातो. भारतात स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलीन झाली आणि कायद्यांनी स्टॅट्यूटरी जमीनदारी संपवली. अशा रीतीने वर्गीय दृष्टिकोणातली सरंजामशाही संपल्यानंतर उरती जातिव्यवस्था. कम्युनिस्ट पक्षाच्या वर्गवादी लोकशाही क्रांत्यांचे काम काँग्रेसी शासनानेच करून टाकल्यामुळे आणि जातिव्यवस्थेला सरंजामशाही म्हणता येत नसल्यामुळे पार्लमेंटरी मागनि मिळालेली राज्य सरकारे चालवणे व केंद्रसत्ता मिळेतो काँग्रेस व भाजप यांच्या आघाडी सरकारांमध्ये `उडदामाजी काळे-गोरे` करणे याशिवाय पर्याय उरला नसल्यासारखे दिसते. घटना संमत झाल्यानंतर आंबेडकरांनी कायदेमंत्र्याचा राजीनामा दिल्यावर जात्यन्तक लोकशाही क्रांतीचा मार्ग सोडून दिला आणि जात्यन्त घटनेवर व नवबौध्द धम्मावर सोपवला. अशाप्रकारे मार्क्सवादी तत्त्वज्ञान जगभरप्रमाणे हतबल झाले आणि आंबेडकरवाद मार्क्सवादाला पर्याय उरला नाही. भांडवलदारी विकास, आरक्षण व प्लूरॅलिस्ट राजनीती यांमुळे शोषितपीडित जातवर्गाचे विद्रोही मुखंड प्रस्थापित झाले. जातिव्यवस्था धार्मिक मूलतत्त्ववाद व जातीयवाद जोपासत आहे आणि भारतीय समाजाचे अरिष्ट सर्वकष करीत आहे. अशा दिशाहीनतेच्या परिस्थितीत बुद्धकाळापासून उदयाला आलेली जातिव्यवस्था ही आजही सरंजामशाही कशी आहे आणि वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूकडे असलेली वरकड जमीन काढूनती गरीब शेतकरी व शेतमजूर जातवर्गांना वाटण्यासाठी जातिव्यवस्था नष्ट करण्याशिवाय तरणोपाय कसा नाही हे या पुस्तकात सप्रमाण दाखवले आहे. -शरद पाटील
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती