पुस्तकाचे नाव : साहित्य: आशय आणि आविष्कार
- Category: Literature
- Author: डॉ. सतीश कामत
- Publisher: शब्दालय प्रकाशन
- Copyright By: शब्दालय प्रकाशन
- ISBN No.: 278-93-86909-04-6
₹240
₹270
1 Book In Stock
Qty:
साहित्य आणि समाज यांचे नाते परस्परपूरक आणि परस्पराश्रयी अशा स्वरूपाचे असते साहित्याचा आशय आणि आविष्कार समजून घेताना हे नातेही जाणून घ्यावे लागते. साहित्यकृतीचे स्वरूप उलघडताना साहित्य विचार आणि समीक्षा व्यवहार फार महत्त्वाचा ठरतो. त्याचाच एक भाग म्हणून तत्त्वचर्चा आणि त्या त्या साहित्यकृतींच्या संदर्भातील विवेचन केले जाते. साहित्यकृतीचा विचार करताना अभ्यासकाला तत्कालीन परिस्थितीचाही विचार करावा लागतो. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजनैतिक आदी बाबींचा विचार अभ्यासक करत असतो. प्रस्तुत ग्रंथातील लेखातही हीच भूमिका ठळकपणे दिसून येते.