जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून वेश्याव्यवसाय, वेश्यांचा व्यापार आणि लैंगिक स्वैराचार हाांना जगभर ऊत आल्याचे दिसून येते. विशेषतः तिसऱ्या जगातील देशांमध्ये ह्याचा अधिक सुळसुळाट झाल्याचे दिसते. म्हणूनच गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या विषयाबद्दलची चिंता व्यक्त केली जात आहे आणि साधक-बाधक चर्चा घडवून आणली जात आहे. काही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि काही स्त्रीवादी संघटना वेश्यांचा धंदा आणि वेश्यांचा व्यापार याचे निर्मूलन करण्याची मागणी करीत आहेत तर इतर काही संघटना आक्रमकपणे वेश्यांच्या धंद्याला कायद्याचे संरक्षण देऊन त्यांचे वैध व्यवसायात रूपांतर करण्याचा आग्रह धरत आहेत. वेश्यांच्या धंद्याला वैधता मिळवून देण्याचं समर्थन करणाऱ्या संघटनांची अशी मागणी आहे की, वेश्याव्यवसायाला उद्योगधंद्याची प्रतिष्ठा मिळावी आणि वेश्यांच्या कामाला इतर कोणत्याही कामासारखी मान्यता मिळावी. तसेच वेश्यांना लैंगिक काम करणाऱ्या कामगार म्हणून गणले जावे. (ILO) सारख्या संघटनेनेदेखील वेश्यांच्या धंद्याला आर्थिक मान्यता देऊन वेश्यांच्या कामाला वैध स्वरूप प्राप्त करून द्यावे अशी मागणी केल्यापासून तर ही चर्चा ऐरणीवर आली आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : वेश्याव्यवसाय लैंगिक अत्याचारच आहे