गेली अनेक वर्षे `मित्र कसे जोडावेत आणि आपले व्यक्तिमत्व प्रभावी कसे करावे` या दोन गोष्टींशी डेल कार्नेजींचे नाव प्रामुख्याने जोडले गेलेले आहे. त्यांचे How to Win Friends and Influence People हे सत्य गोष्टींवर आधारित पुस्तक आजपर्यंत सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून ओळखले गेलेले आहे. या पुस्तकाने त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. तथापि, How to Win Friends and Influence People हे काही डेल कार्नेजी यांनी लिहिलेले पहिले पुस्तक नव्हे. सन १९२६मध्ये डेल कार्नेजी यांनी, Public Speaking and Influencing Men in Business या नावाने एक पुस्तक लिहिले. हे जाहीर संभाषण शिकण्यासाठी लिहिलेले पाठ्यपुस्तक होते. डेल कार्नेजी यांच्या `प्रभावी संभाषण आणि मानवी संबंध` या विषयावरच्या जगप्रसिद्ध प्रशिक्षण कोर्ससाठी हे पुस्तक तेव्हापासून आजपर्यंत इतर मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकांमधले एक गणले जाते. त्यांच्या वाय.एम.सी.ए. येथील जाहीर संभाषणाच्या प्रशिक्षण वर्गात देखील हे पाठ्यपुस्तक वापरले गेले आहे. गेल्या केवळ दहा वर्षांत या पुस्तकाच्या ६,००,००० प्रतींची विक्री झालेली आहे. आणि त्याची एकूण विक्री आजपर्यंत १०,००,००० लाख प्रतींहून अधिक झालेली आहे. त्याशिवाय या पुस्तकाचा जगातील जवळपास वीसेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. आणि त्या त्या भाषेतूनही प्रकाशित होऊन या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. वाचनप्रिय वाचकांनाया सर्व गोष्टींची जाणीव आहेच. काही वर्षांपूर्वी आमच्याशी संलग्न असलेल्या प्रेसच्या प्रकाशकांनी मला येऊन सांगितले, की जर माझ्या स्वर्गवासी पतीच्या या पहिल्या पुस्तकांची आपण एक नवीन, सुधारित, पॉकेट बुक आवृत्ती काढली तर बरे होईल आणि लोकांनाही ते आवडेल, माझ्याप्रमाणेच त्यांनाही असेच वाटत होते की या पुस्तकात रोजच्या दैनंदिन आयुष्याचा सामना करण्यासाठी फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
- डोरोथी कार्नेजी
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जाहीर संभाषण कला शिकून आत्मविश्वास वाढवा