पुस्तकाचे नाव : हिंदू धर्म म्हणजे काय ?
- Category: Translate
- Author: तारा धर्माधिकारी
- Publisher: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
- Copyright By: नॅशनल बुक ट्रस्ट (इंडिया )
- ISBN No.: 978-81-237-1523-0
₹30
₹35
1 Book In Stock
Qty:
हिंदू धर्म म्हणजे काय या पुस्तकात महात्मा गांधींचे विचार संकलित करण्यात आले आहेत. हिंदू धर्म हा एक धर्म नसून ती एक जीवनपद्धती आहे. हिंदू धर्माचे सौंदर्य त्याच्या सर्वसमावेशक व्यापकतेत आहे. हिंदू धर्म प्रत्येकाला त्याच्या श्रद्धेनुसार वा धर्मानुसार आपल्या देवाची पूजा करण्यास सांगत असल्यामुळे तो इतर धर्मासोबत शांततेने व सलोख्याने नांदतो. या धर्मात विशिष्ट मतप्रणालीचा आग्रह नाही. त्यामुळे आपल्या अनुयायाला तो आत्मविष्कारासाठी जास्तीत जास्त वाव देतो, या गोष्टीचे मला जबरदस्त आकर्षण आहे. अहिंसा ही सर्व धर्मात समान आहे पण हिंदू धर्मात तिचा आविष्कार आणि आचार फार उच्च कोटीचा आहे. हिंदू धर्म हा ऐतिहासिक काळापासून चालत आलेला आहे. हिंदू धर्माला कुंठितावस्था मान्य नाही, तो विकासशील आहे.