प्रकाशवाटा : एक आकलन` हा अतुल चौरे यांचा एक उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. खरे तर एखाद्या पदवीसाठी केलेल्या अभ्यासाला पुस्तकरूपाने प्रसिद्ध करताना त्यावर पुन्हा संस्कार होत असतात. सदर ग्रंथ हा एम. फिल. या पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधिकेचा पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत असलेला एक सुटसुटीत असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ पुढील संशोधकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. विशेषतः `आत्मचरित्र` अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना या ग्रंथामुळे एक विशा प्राप्त होईल.
`आत्मचरित्र` हा लिहिण्यासाठी सर्वात सोपा व सर्वात अवघड असा साहित्यप्रकार असल्याचा, अतुल चौरे यांनी काढलेला निष्कर्ष नोंदणीय आहे. `आत्मचरित्र` या साहित्यप्रकाराची संकल्पना स्पष्ट करणारा पहिला भाग, डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी यशस्वी केलेला `लोकबिरादरी प्रकल्प` हा दुसरा भाग व `प्रकाशवाटा` ह्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या आत्मचरित्राचे स्वरूप, त्यातील आदिवासींचे दुःखमय व संघर्षमय जीवन, त्यांचे अज्ञान, आरोग्याचे प्रश्न यांचा घेतलेला वेध, हेमलकसा परिसरातील प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व आदिवासींच्या अंधकारमय जीवनात नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी केलेला संघर्ष अशा आशयानुसारी घटनांचा नेमका परिचय करून दिला आहे. तसेच आत्मचरित्र म्हणून केलेले मूल्यमापन अखेरीस येते, अशी सूत्रबद्ध मांडणी या ग्रंथात केली आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : प्रकाशवाटा : एक आकलन