पुस्तकाचे नाव : मराठी दलित कविता
- Category: Literature
- Author: बी. रंगराव
- Publisher: साहित्य अकादेमी
- Copyright By: Sahitya Academi
- ISBN No.: 81-260-2020-2
₹85
₹90
1 Book In Stock
Qty:
मराठी दलित कविता हे गेल्या चार दशकातील मराठी दलित कवितेचे प्रातिनिधीक स्वरूप होय. खऱ्या अर्थाने मराठी दलित कवितेची सुरुवात बरीच आधी झाली होती, परंतु दलित कवितेचे ते आधीचे स्वरूप काहीसे प्रचारकी होते, कारण त्याकाळी तिचा पेट संबंध दलितांच्या सामाजिक व राजकीय चळवळीशी होता. एकोणिसशे साठच्या दशकात सामाजिक परिवर्तनाच्या ज्या अनेक घटना घडल्या त्या घटनांचा परिणाम दलित कवितेवरही होऊन तिला वाङ्मयिन जगात स्वतःचे असे एक स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यानंतर दलित कविता बहरत जाऊन ती वाङ्मयिन संकल्पनेच्या विविध स्तरांवर स्थिरावत गेली. आज ती भारतीय साहित्याचा अविभाज्य घटक बनली आहे.