`संस्काराचे खरे शिल्पकार` हे पुस्तक वाचकांच्या हातात देताना आनंद होत आहे. डॉ. सुधाकर न्हाळदे यांच्या सुसंगत फौंडेशनतर्फे मागील जीवनप्रवास या स्वकथनांच्यानिमित्ताने वाचकांसमोर येत आहे. स्वयन २५-३० वर्षांत दिलेल्या आदर्श माता-पिता पुरस्कारार्थीपैकी काहींच म्हणजे त्या काळाचा आरसा असतो. कारण त्यातून तत्कालीन कोटबि जीवन, सामाजिक रूढी-संकेत, आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक संदर्भ आई सर्वच गोष्टी अधोरेखित होत असतात. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे ए महत्त्वाचा सामाजिक दस्तावेज आहे. कारण या पुस्तकात ज्या ज्या व्यक्तीग जीवनप्रवास अधोरेखित झाला आहे. ते सर्वचजण अत्यंत गरिबीतून व संघां करीत, प्रतिकूलतेतून मार्ग काढत, संकटांवर मात करून स्वतःचा एक आटां समाजासमोर ठेवलेले आहेत. सर्वांनी एक महत्त्वाचे सामाजिक स्थान मिळवलेले आहे. त्यांनी आपल्या पाल्यांवर खऱ्या अर्थाने उत्तम संस्कार करून, शिक्षण देऊन घडवलं आहे. हे पुढील पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरक आहे त्यामुळे त्यांना संस्काराचे खरे शिल्पकार म्हटलेले आहे. म्हणूनच पुस्तकाचे शीर्षकही अगदी यथार्थ आहे, हे लक्षात येते. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे एक समाजशिल्पच आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.संस्थात्मक कार्य किती मोठे असू शकते, याची प्रचिती या पुस्तकाच्या निर्मितीमुळे सर्वांच्या समोर येत आहे. कारण दीपस्तंभाप्रमाणे कार्य असणारे समाजातील काही आदर्श माता-पिता निवडून त्यांचे कर्तृत्व उजागर करण्याचे कार्य या पुस्तकामुळे होत आहे. तसेच यात विविध प्रांतांतील, विविध जाती-जमातींचे, विविध आर्थिक सामाजिक स्तरांतील, विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववार व्यक्तींचे जीवनकार्य समोर येत आहे.प्रत्येकाच्या जीवनात संघर्षाचे अनेक प्रसंग येत राहतात. अशा प्रसंगी आपण घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे ठरत असतात. आजच्या सामाजिक अस्थिरतेच्या काळात हे पुस्तक वाचकांसमोर येत आहे, हे खूप महत्वाचे आहे. कारण कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक प्रश्नचिन्हं समोर असल्याने या काळात आपल्या नकारात्मक विचारांमुळे अनेकजण हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या पुस्तकाच्या वाचनातून वाचकांना नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल. कारण या पुस्तकात आलेले जीवनानुभव हे साधारण १९४०-५० पासून ते २०२० पर्यंतच्या काळातील आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान विकसित होत असण्याचा हा काळ आहे. तसेच सर्वांच्या जीवनकथा गरिबीतून सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे कष्ट, प्रामाणिकपणा, शिक्षण, चिकाटी, जिद्द, सातत्य अशा विविध जीवनमूल्यांची कास धरून आपल्या जीवनात सर्वांनी परिवर्तन घडविले आहे, पद, प्रतिष्ठा, पैसा अशा विविध गोष्टी प्राप्त केल्या आहेत. त्यामुळे शून्यातून सुरुवात करून आज आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा, नावलौकिक, मानसन्मान मिळवून प्रत्येकजण आज आपल्या आयुष्यात समाधानी आहे, हे महत्त्वाचे आहे. ही गोष्ट वाचकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना आवडेल, अशी खात्री आहे. या पुस्तकाच्या निर्मितीची संकल्पना मांडणारे लक्ष्मीकांत देशमुख सर, ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारे डॉ. सुधाकर न्हाळदे व सौ. संगीता न्हाळदे आणि या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे मा. अॅड. श्रीपाद पंचपोर, अध्यक्ष कॉसमॉस फौंडेशन, तसेच प्रकाशक निखिल लंभाते आणि सुसंगत फौंडेशन पुणेचे पदाधिकारी हे सर्वच जण या निर्मितीसाठी कौतुकास पात्र आहेत.
-प्रा. रूपाली अवचरे
प्रकाशक, यशोदीप पब्लिकेशन्स
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : संस्काराचे खरे शिल्पकार (लेखसंग्रह)