पुस्तकाचे नाव : मराठी संज्ञाप्रवाही कादंबरी
- Category: Literature
- Author: अनिल उगले
- Publisher: स्वरूप प्रकाशन
- Copyright By: अनिता उगले
- ISBN No.: 978-81-910112-08
1 Book In Stock
मराठी संज्ञाप्रवाही कादंबरी` या विषयावरील पीएच.डी. च्या प्रबंधाचे पुस्तकात रुपांतर होताना मला मनस्वी आनंद होत आहे. संज्ञाप्रवाह ही संकल्पना एम्.ए. ला असताना मर्देकरांच्या संदर्भात समजावून घेण्याचा प्रयत्न केला. एम्. फिल. ला असताना मर्देकरांच्या कादंबऱ्यावर संशोधन केले व पीएच.डी. साठी मराठीतील इतरही कादंबऱ्या अभ्यासण्याचे ठरविले. मराठीत बेडेकर व मर्डेकरांपासून संज्ञाप्रवाही लेखनतंत्र लेखनात आलेले आहे. या विषयावर समीक्षनात्मक लेखन तसे दुर्मीळच आढळले. परंतु अनेक कादंबऱ्यात हे तंत्र लेखकांनी वापरलेले पाहुन माझ्या मनात संशोधनाची जिज्ञासा निर्माण झाली. संशोधन करताना मूळ संदर्भ शोधण्यासाठी मोठे प्रयास करावे लागले. नामवंत समीक्षकांचे या विषयावरील विवेचन पाहून अनेकदा बिचकलो, तरी या विषयाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला आणि आपण या नवीन विषयाचा शोध घेतो आहोत असे अनेकदा जाणवले. यामुळे उत्साह वाढत गेला. आणि या संशोधनाला दिशा मिळाली.