लेखकाचे मनोगत
या चरित्रमालेच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे माझे पहिले पाऊल. हे चरित्र आज जरी प्रकाशित होत असले, तरी ह्या विषयावर लिहिण्याचा मनोदय वडिलांनी व काही मित्रांनी मांडला. सावित्रीबाईंच्या जीवनावर लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा इतिहास सांगू लागला की, समाजात जेव्हा तुच्छता अथवा तिरस्कार वाट्याला येतो तेव्हा समाजाचा उच्छवास ज्यालामुळातून जागृत करण्याचा प्रयत्न होतो. जे जीर्ण झालेले असते ते उद्ध्वस्त होते. आकाशातले झकोळ नवविचारांच्या प्रकाश किरणांनी छिन्नविछिन होते आणि तेथूनच नव्या आशेची पहाट उदयास येताना दिसते. येथेच जुन्याचा अंतकाळ आणि नवयुगाचा प्रभात काळ ठरत असतो. त्या काळाच्या आगमनासाठी उपेक्षित समाज आतूर असतो.भारतीय संस्कृतीचा अभ्यास करीत असताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते ती म्हणजे, स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या, सर्वसामान्यांना शिक्षणाचे महाद्वार खुले करून देणाऱ्या सावित्रीबाईंवर साहित्यिकांनी अन्याय केला व इतिहासकारांनी त्यांना उपेक्षित ठेवले. त्यांच्या चरित्राचा सविस्तर अभ्यास करताना कल्पना व सत्य यातील अंतर जाणवले. हा अभ्यास करण्यासाठी अनेक पुस्तकांची, दस्तऐवजांची गरज भासली, वेळेप्रसंगी वास्तव घटनास्थळी पोहचावे लागले. काही दुर्मीळ पुस्तके मिळवावी लागली. या सर्वांसाठी लहान-थोरांनी साहाय्य केले. त्या सर्वांची आज आठवण होतेय.मला कुठल्याही विषयावर अडचण भासल्यास फोनवरसुद्धा ह.भ.प. नरेंद्र गुरव यांनी मदत केली. सौ. कविता मंडळ, डॉ. सयाजी पगार, सौ. पुष्पलता महाजन, श्री. रविंद्र माळी (अध्यक्ष माळी महासंघ, पुणे), प्रा. रविंद्र माळी, विकास प्रिंटींग अॅण्ड प्रा.लि. नाशिक, प्रविण जोंधळे (अक्षरबंध प्रकाशक) यांनी आपुलकीने मला सहाय्य केले.
- श्रजय सुनिल अभोणकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सावित्री एका क्रांतीमय पर्वाची सुरुवात...