कोकणातील लोकसाहित्य विविधतेने नटलेले आहे. त्याचे संशोधन व अभ्यासाचा विषय अत्यंत मोठा आहे. या पुस्तकात फक्त रत्नागिरी मधील खेड, दापोली व मंडणगड तालुक्यातील लोकसाहित्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणी माणूस उत्सव प्रिय आहे. सन, उत्सवाच्या निमित्ताने कोकणात आजही पारंपरिक लोक विधी, लोकनृत्य केले जाते. आजच्या विज्ञान युगातही ही कला जोपासली जाते. परंतु आधुनिकतेचा त्यांच्यावर प्रभाव पडला आहे. त्याच्या सादरीकरण, आशयात झालेला बदल दिसून येतो. तरीही अजून जुने वयस्कर लोकांकडे ही कला जिवंत आहे. ती जर आपण जतन केली तरच ती टिकून राहील अन्यथा ती लोपपावेल. या पुस्तकात कोकणातील काही भागातील बदलत्या लोककलेचे स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
- डॉ. संजय पाटोळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कोकणातील लोकसाहित्या मधील सामाजिक व सांस्कृतिक जीवन