"महाराष्ट्रातील बहुजनवादाचा विकास` हे पुस्तक लिहिण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले व सहकार्य केले त्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक निर्देश करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी या सर्व विभागीय प्रक्रियेत मार्गदर्शक म्हणून नव्हे तर वैयक्तिक पातळीवरील लहान-मोठ्या प्रश्नांबद्दल मार्गदर्शन केले. मी डॉ. सुरेंद्र जोंधळे यांच्या ऋणातच राहू इच्छितो. हा शोधनिबंध लिहिताना अनेक मान्यवर अभ्यासकांचे मार्गदर्शन मला लाभले. डॉ. य. दि. फडके, डॉ. बाबा आढाव, प्रा. राम बापट, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गेल ऑम्वेट, डॉ. भारत पाटणकर, डॉ. राजेंद्र व्होरा, डॉ. गोपाळ गुरू, डॉ. सुहास पळशीकर, डॉ. यशवंत सुमंत, श्री. शांताराम पदेरे, श्री दत्ता देसाई, मनोहर कदम, प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांनी चर्चा करून उपयुक्त सूचना केल्या.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : महाराष्ट्रातील बहुजनवादाचा विकास