प्रस्तुत पुस्तक ‘बौद्धधम्मात उपासकांसाठी विनय आणि संस्कार’ स्वयंस्फूर्त रीतीने उपासकांसाठी केले गेलेले एक मौलिक कार्य आहे. यापूर्वी मी या विषयाशी संबंधित पुष्कळ पुस्तके पाहिली आणि वाचली आहेत या विषयावर अनेक विद्वान लोकांनी कार्य केले आहे, परंतु त्यात काही सिगोलवाद सूत्त होते तर महामंगल सुत्त नव्हते, कधी महामंगल सुक्त होते तर बावीस प्रतिज्ञा नव्हत्या. मला नेहमी वाटत होते की, उपासकांसाठी सर्व विनय (नियम ) एका ठिकाणी एका पुस्तकात मिळावेत हाच विचार करून मी उपासकांच्या विनयाशी संबंधित पुस्तकाचे लेखन करण्याचा निश्चय केला. तिपिटकाच्या दिघानिकाय मधील सिगोल वाद सुक्त हेच माझ्या लेखनाची प्रेरणा झाले आहे. याचे दार्शनिक महत्त्व आपणास सुद्धा माहित आहे उपासकांसाठी सांगितली गेलेली एवढी महत्त्वाची आणि विस्तृत माहिती आम्हाला अन्यत्र कुठेच मिळत नाही.
~सुषमा पाखरे.~
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बौद्ध धम्मात उपासकांसाठी विनय आणि संस्कार : भीमराव गणवीर (अनुवादक)