`कुणन्याची कविता` हा माझा पहिला काव्यसंग्रह, त्याचं मराठी वाचक अभ्यासक, समीक्षक यांनी स्वागत केलं. या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाने `कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्य पुरस्कार` देऊन सन्मानित केले. विविध विद्यापीठांनी काव्यसंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश करून सन्मान केला, इतरही बारा-तेरा राज्य पुरस्कारांनी `कुणच्याच्या कवितेचा` सन्मान केला. आज माझा दुसरा काव्यसंग्रह श्री कुसाच्या कविता` आपल्या हाती स्वाधीन करताना मला अतिशय आनंद होत आहे. वाचक, अभ्यासक आणि समीक्षक श्री कुसाच्या कविता` चं स्वागत आनंदाने करतील अशी मी अपेक्षा करतो. माझं सारं आयुष्य गावखेड्यात गेलेलं. स्वत:चं आयुष्य सोबत घेऊन चालताना अवतीभोवतीचे वास्तव मी न्याहाळत आलो. त्यामुळे अनेक निरिक्षणं माझ्या मनावर खोल चितारली गेली. विशेष म्हणजे स्त्रियांचं जगणं हा माझा नेहमी चिंतनाचा विषय बनला. पुढे तो कळत नकळत कवितेत डोकावत राहिला. कालच्या आणि आजच्याही खीयांच्या जीवनातलं उपेक्षितपण मी अनुभवत आलो. सनातनी समाज व्यवस्थेचा पगडा आजही इतका दूर झालेला दिसत नाही. तसेच अजूनही रुढी, परंपरांची सनातनी बंधनं कोणत्या ना कोणत्या स्वरुपात खी मनावर, तिच्या स्वातंत्र्यावर जोखड होऊन पडून आहे. हे सगळं पाहताना, अनुभवताना या सर्वांचा परिणाम माझ्या संवेदनशील मनावर होत गेला. त्या चिंतनाचा परिपाक म्हणजे `खी कुसाच्या कविता` हा काव्यसंग्रह होय, त्यात त्यांच्या मनाचा कोलाहल आहे, घुसमटनं आहे. ज्या सकल समांतर वास्तवात जीवन जगताना मी उघड्या डोळ्यांनी जे पाहिलं आणि पाहतो आहे, त्याची अभिव्यक्ती म्हणजे `स्त्री कुसाच्या कविता` होय.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : स्त्री कुसाच्या कविता