माझे परम स्नेही प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे यांच्याशी गेल्या पाच, सहा वर्षापासूनचा परिचय परिचयाचे रूपांतर घनिष्ठ मैत्रीत झालं. अत्यंत निगवीं, प्रसिध्दी, मानपान, अहंकार अशा विकारांपासून दूर असलेलं साधं सरळ, काहीसं भावनिक व सतत नाविन्याचा शोध घेणार व्यक्तीमत्व, अनेक माणसं जोडली तसे छंदही लेखनाची उर्मी दाटून येऊन त्यासाठी प्रवृत्त होणं हाच क्षण माणसातील लेखकाला नवनिर्मितीची साद घालणारा ठरतो. लेखक होण्या अगोदर उत्तम वाचक व्हावं लागतं. वाचकाच्या नजरतेतून लेखकाचे अस्तित्व नवीन वाचकाला साद देणारे ठरून अशा शब्दांना गोंडसपणा येतो. दैनंदिन जीवन जगताना टिपलेले क्षण, आत्मसात केलेल्या भावना व कौंटुबिक नात्याचे सर्व पापुद्रे बाजूला करत सुगंध दरवळणारे `घालमेल` नावाचे शब्दफूल खरोखरच सुगंधीत झाले आहे. सराईत लेखकी बाज, शब्दजंजाळ, पांडीत्यपूर्ण भाषा याचा मोह टाळल्याने `घालमेल` वाचून पूर्ण होईपर्यंत वाचकाची घालमेल वाढविणारं ठरते. आमचे स्नेही ढाकणे सरांचा अशा स्वरुपाचा पहिला प्रयत्न बऱ्याच अंशी त्यांनी यशस्वी केला आहे. वास्तवाचा स्पर्श कथानकाला लाभल्याने कुटुंबा कुटुंबात विकास-वैशाली (वैशू) चे नाते वेगळा जिव्हाळा जपत, सुख-दुःखाच्या लाटांचे हिंदोळे झेलत पुढे चालत आहेत. भारतीय कुटुंब व्यवस्थेचे यथार्थ चित्रण जसे घालमेलमध्ये लक्ष वेधते. तसे सासर-माहेरचे द्वंद्व मुलीच्या मनात किती वेगाने सुरू असते. याचीही कल्पना येते. कामगार जगतातील व त्याच्या कुटुंब कबिल्याचे भावनिक दर्शन भांडवलशाही, मजूरशाही आदींकडे लक्षवेधणारी ठरते आहे. हलकं, घटकाभर विरंगुळा देऊन जगण्याची सकारात्मक ऊर्जा वाढविणारा `घालमेल`चा प्रयोग माझ्या मित्राच्या लेखकत्वावर शिक्कामोर्तब करणारा ठरो. विपुल लेखनाबरोबरच वाचकांचे विपुल प्रेम मिळून त्यांनी खूप खूप लिहावं आणि आम्ही वाचतच रहावं. बस्स शुभेच्छा !
- अविनाश मंत्री
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : घालमेल