एखाद्या वैचारिक ग्रंथाला अगर ललितकृतीला प्रस्तावना लिहिणे ही अतिशय जबाबदारीची, म्हणूनच अवघड गोष्ट असते. अशा प्रस्तावनांमधून केवळ ग्रंथाचा परिचय नसतो, तर त्यानिमित्ताने प्रस्तावनालेखकाचे चिंतनही प्रकट होत असते. अशी चिंतनशीलता आणि जबाबदारीची जाणीव असणाऱ्या फार थोड्या लेखकांमध्ये उत्तम कांबळे यांचा समावेश होतो. उत्तम कांबळे हे ललित लेखनापासून संशोधनापर्यंत लेखन करणारे चतुरस्र लेखक आहेत. त्यांच्या सर्वच लेखनामधून व्यापक आणि समाजहितैषी दृष्टी दिसते. अशा लेखकाच्या निवडक दहा प्रस्तावनांचे संपादन डॉ. मिलिंद कसबे यांनी केले आहे.
डॉ. मिलिंद कसबे हे नव्या पिढीचे गंभीर प्रकृतीचे संशोधक अभ्यासक आहेत. संपादन कसे करावे याचे उत्तम भान या संपादनातून व्यक्त होते. प्रारंभी प्रस्तावना लेखन म्हणजे काय याचा तात्विक व्यूह त्यांनी स्पष्ट केला आहे, तो अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक असा आहे. किंबहुना डॉ. मिलिंद कसबे साहित्याभ्यासाकडे किती गंभीरपणे पाहतात, याचे निदर्शक असे हे संपादन आहे. शिवाय मूळ प्रस्तावनांमधून दिसणारी चिंतनशीलता, विषयाची व्यापकता आणि मूळ विषयाचा आवाका जाणून` घेण्याची कुवत संपादकामध्ये असण्याची आवश्यकता असते तरच प्रस्तावनांचे संपादन आणि मूल्यमापन करता येते.
या साऱ्याच गोष्टी डॉ. मिलिंद कसबे यांच्याकडे आहेत आणि हे काम त्यांनी जबाबदारीने आणि गांभीयनि केले आहे. म्हणूनच हा ग्रंथ जागतिकीकरणानंतरच्या वास्तवाचा शोध घेणारा मराठी वैचारिक वाङ्मयातील महत्त्वाचा ग्रंथ ठरतो.
(मुखपृष्ठावरील)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : उत्तम कांबळे यांच्या प्रस्तावना