`यक्षांची देणगी `नंतर हा दुसरा विज्ञानकथासंग्रह वाचकांपुट ठेवताना मन्त्र आनंद आणि कृतज्ञता वाटत आहे. माझ्या पहिल्या कथासंग्रहांचे वाचकांनी उत्स्फुर्त स्वागत केले त्यामुळेच हे पुढचे पाऊल टाकायचे धाडस मी करीत आहे. व्या धाडसामागे मधुकाकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे आहे हे प्रथम नमूद करतो.विज्ञानकथा मी कोणत्या हेतूने लिहितो आणि तिचे स्वरूप कसे असावे व्याचद्दल भी` यक्षांची देणगी `च्या प्रस्तावनेत सविस्तर लिहिले होते म्हणून त्या गोष्टींचा येथे पुनरुच्चार करावासा वाटत नाही. परंतु माझ्या विज्ञानकथांची आणि `प्रेषित` व्या विज्ञानकादंबरीची परीक्षणे वाचून एक मुद्दा स्पष्टपणे मांडावासा वाटतो.मुद्दा सुज्ञ वाचकांना सहज पटेल असा आहे: परंतु काही अतिसुज्ञ टीकाकारांनी ह्या बाबतीत घोळ घातल्यामुळे तो इथे मांडणे भाग पडते.विज्ञानकथा ही निव्वळ परिकथा, फॅण्टसी अथवा भयकथा नसावी हा माझा आग्रह असतो. त्यासाठी त्या कथेला एखाद्या वैज्ञानिक कल्पनेचा अथवा सिद्धान्ताचा पाया असणे आवश्यक आहे. क्वचितच ही वैज्ञानिक कल्पना किंवा वैज्ञानिक सिद्धान्त कथालेखकाचा स्वतःचा असतो. परंतु त्यामुळे विज्ञानकथेला `नकली` म्हणू नये. उदाहरणार्थ, ह्या कणसंग्रहातील `हिमप्रलय` ही कथा ज्या वैज्ञानिक कल्पनेवर आधारलेली आहे ती प्राध्यापक फ्रेड हॉयेल यांनी आपल्या `आइस` नावाच्या पुस्तकात मांडली होती. पृथ्वीवर वेळोवेळी हिमयुगे का अवतरतात ह्या प्रश्नाची कारणमीमांसा होंयेलनी ह्या पुस्तकात केली आहे त्यांनी ह्या कल्पनेवर आधारलेली विज्ञानकथा लिहिली नव्हती. तेव्हा `हिमप्रलय` या कथेला `आइस `चे भाषांतर म्हणता येणार नाही.
- जयंत नारळीकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अंतराळातील भस्मासुर