मराठी साहित्यविश्वात ह. मो. मराठे या नावाला वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान आहे. ह. मो. मराठे हे बहुअवधानी असे व्यक्तिमत्त्व आहे. एक पत्रकार, संपादक आणि लेखक म्हणून वावरत असताना त्यांना अनेक माणसे भेटली. वडिलांच्या भटकंती आणि तीर्थाटनाच्या निमित्ताने त्यांनाही भटकंती घडली. कौटुंबिक अनेक संघर्षांना त्यांना सामोरे जावे लागले. विविध घटना प्रसंगांनी त्यांचे जीवन ढवळून निघाले. वाट्याला आलेल्या भ्रमंतीत त्यांना अनेक माणसे भेटली. त्यांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले, अनुभवले ते जीवन त्यांनी शब्दबद्ध केले. क़था-कादंबर्यां च्या आणि इतरही लेखनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे जगणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माणूस, त्यांचे विचार, विकार, भावना, वासना, विविध नातेसंबंध, माणसांचे जीवन, कुटुंब, समाजव्यवस्था, धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, माणसांच्या जीवनधारणा अशा विविध पातळ्यांवर माणसाला जाणून घेण्याचा प्रयत्न ह. मो. मराठे यांची लेखणी करते.
ह. मो. मराठे हे बहुअवधानी असलेले असे व्यक्तिमत्त्व आहे. एक पत्रकार, संपादक आणि लेखक म्हणून वावरत असताना त्यांना अनेक माणसे भेटली. त्यांचे जीवन जवळून पाहिले, अनुभवले. त्यांनी शब्दबद्ध केले. साहजिकच कथा-कादंबर्यां च्या आणि इतरही लेखनाच्या माध्यमातून त्यांनी माणूस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान आहे. त्यात पुरुषाला विविध पातळ्यांवर वावरावे लागते. पुरुषी अहंकारामुळे त्याचे व्यक्तिगत आणि सामाजिक स्थानही वेगळे ठरते. त्याची जबाबदारी वाढते. समाजाचा एक घटक म्हणून त्याचे वेगळेपणही जाणवते. त्यामुळे पुरुष, त्याचे व्यक्तिगत जीवन, कुटुंबातील स्थान, समाजव्यवस्थेतील स्थान, पारंपरिक मानसिकता, धर्मकारण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, जीवनधारणा, तत्त्वज्ञान जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून “ह. मो. मराठे यांच्या कथा-कादंबर्यां मधील पुरुषचित्रण : एक आकलन” हा विषय निवडला आहे. हीच या विषयनिवडीची भूमिका आहे....(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : ह.मो.मराठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमधील पुरूषचित्रण