पुस्तकाचे नाव : सम्राट अशोकाचा राजधर्म आणि आर्यांची मनुस्मृती
- Category: Ideology
- Author: ज्ञानेश्वर ढावरे
- Publisher: सुगावा प्रकाशन
- Copyright By: ज्ञानेश्वर ढावरे
- ISBN No.: 978-93-84914-80-6
1 Book In Stock
कलकत्ता बैराट येथील लघुशिलालेख मगधचा राजा भिक्षुसंघाला अभिवादन करतो आणि संघाच्या कुशलतेची मंगल कामना करतो. हे भदंत गण ! आपणास माहीत आहे की, बुद्ध धम्म आणि संघावर आमची किती भक्ती व श्रध्दा आहे. हे भदंत गण ! जे काही भगवान बुद्धांनी सांगितले ते सर्व उत्तम आहे. पण हे भदंत गण ! माझ्या समजुतीप्रमाणे ज्यामुळे धर्म चिरस्थायी राहिल ते ते मी येथे लिहवून घेत आहे. भदंत, ती धर्मसूत्रे अशी, विनयसुकसे अलियवसानि (आर्यवंश, आर्यजीवनपध्दती) अनागतभयानि, मुनिगाथा, मोनेयसूते, उपतिसपसिने व भगवान बुद्धांनी असत्याबाबत लाघुलास (रघूलास) केलेला उपदेश या धर्मग्रंथांचे हे भदंत गण ! माझी अशी इच्छा आहे की, बहुसंख्य भिक्षू व भिक्षुणींनी या धर्मसूत्रांचे वारंवार श्रवण व मनन करावे आणि मनात ठेवावे. अशाच प्रकारे उपासक व उपासिका यांनीही करावे. हे भदंज गण ! मी यासाठी हा लेख लिहविला आहे की लोकांना माझी इच्छा, उद्देश कळावा !