कोरोना महामारीनं अख्खं जग आपल्या कवेत घेतल्याने जगभरातील सगळ्या व्यवस्थाच बदलून गेल्यात. कोरोनाच्या संसर्गाने मानवी जीवनावर आणि मानवी मनावर कल्पनातीत परिणाम केला आहे. भारतीय समाजात ब्राम्हणी विचारसरणीच्या धर्मसंस्था आणि समाजसंस्थेनं शतावधी वर्षे अस्पृश्यता ही अमानुष - अमानवी प्रथा लादून मनुष्यत्व स्खलित केलं होतं. त्या प्रथेची भीषणता ठसठशीत जाणवावी असा अनुग्रह कोरोना महामारीनं केला. माणसांचा परस्परांशी स्पर्श निषिध्द मानला गेला. अस्पृश्य प्रथेतील स्पर्श निषिध्दतेत हीनत्व, घृणा आणि मानखंडना होती. कोरोना स्पर्श निषिध्दतेत मरणभय दडलेलं आहे. कोरोनाच्या भयकंपानं मानवी सृष्टी आणि त्यांचे अस्तित्वच अस्थिर करून टाकलं. कोरोनाच्या भयकंपाचा विदारक फटका बसला तो श्रमजीवी-साधनवंचित उपेक्षित समाजाला. या समुहाचं जगणंच विकलांग झालं. अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रा. गंगाधर अहिरे यांना या भयव्याकूळतेनं भावूक करणं अगदी स्वाभाविक आहे. आपलं काळीज जसं द्रवतं तसंच ज्यांच्या संवेदना अंकुरासारख्या नाजूक आणि कोवळ्या आहेत, अशा कविकुळातील ४६ सृजकांच्या भळभळीला एकत्र करून गंगाधररावांनी `कोरोना: सर्पकाळातील काही कविता` हा प्रातिनिधिक कवितासंग्रह सिध्द केला आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कोरोना