माझे पहिले नाटक "दुसरे प्रेम" आणि दुसरे नाटक "फ्रीडम 75" एकत्रितपणे वाचकांच्या हाती देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. खरेतर २०१५ पूर्वी मी नाटक लिहू शकतो असे मला कोणी म्हणाले असते तर मी ते नाकारले असते, नाटक मनापासून पाहणे त्यात रमून जाणे नाटकांची परीक्षणे वाचणे आणि तीच नाटके नाशिकला आली की पुन्हा पाहणे ही आमची आवड आहे. अर्थात चौफेर वाचनात आणि कार्यकर्ता म्हणून समाज अनुभवतांना काही निरीक्षणे मनात घर करून राहतात त्यातूनच "दुसरे प्रेम" हे नाटक माझ्याकडून लिहिले गेले. जागतिकीकरणाच्या रेट्यात लादल्या गेलेल्या अतिरेकी स्पर्धेत नोकरी-धंद्यासाठी द्यावे लागणारे १२-१५ तास, यातून जगणे तर दूरच पण कुटुंबात राहणे आणि ते सांभाळणे देखील कठीण झाले आहे. मुलांच्या असुरक्षित अर्थकारणाच्या भीतीतून आर्थिक आणि प्रापंचिक जबाबदारी सांभाळणाऱ्या कुटुंब प्रमुखाचा जोडीदार जेंव्हा सोडून जातो तेंव्हा येणारा एकटेपणा आणि कुटुंबात असूनही येणारे तुटलेपण अस्वस्थता निर्माण करीत असतांनाच अशा व्यक्ती कुटुंबात अडगळ होऊन जातात. अश्या वेळेस माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत प्रेमाची ओल हवी असते याची जाणीव एवढी तीव्र होत जाते की, त्याचे मूळ जात, धर्म, पंथ आणि कौटुंबिक भीती या कणखर पाषाणी अडचणीतूनही पाणथळी पोहचतात आणि त्यातूनच "दुसरे प्रेम" हे नाटक लिहिले गेले.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : दुसरे प्रेम फ्रीडम 75