`विज्ञानोबा, तू माझा सांगाती` हा माझा तिसरा बालकविता संग्रह. पहिला `न्यूटन आणि कविता` या संग्रहाच्या लागोपाठ दोन आवृत्त्या निघाल्या दुसरा, `विज्ञानाची किमया` हा दिलीपराजनेच काढला त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आता हा तिसरा पुन्हा दिलीपराज तर्फेच प्रसिध्द होत आहे याचा मला आनंद होणे साहजिकच आहे,. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे नवीन पिढी अधिक चौकस झाली आहे हे निश्चित. त्यामुळे त्यांच्या हातात जे बालसाहित्य / किशोरसाहित्य आपल्याला द्यायचे आहे ते त्यांच्या कुतूहलाची पूर्ती करतील असेच हवे हे भान ठेवूनच या कविता लिहिल्या आहेत. साहजिकच शास्त्रज्ञ, त्यांनी लावलेले शोध, तसेच समाज सुधारणा करण्यासाठीं ज्यांनी आपले आयुष्य वेचले ते समाजसुधारक हे कवितांचे विषय होणे अतिशय महत्त्वाचे होते त्या प्रमाणे त्यांना कवितेतून एकप्रकारे मानवंदनाच दिली आहे. अनेक कवितांचे विषय त्यांच्या पाठ्य पुस्तकातही सापडतील, त्या दृष्टीनेही विद्यार्थ्यांना हे पुस्तक मोलाचे ठरेल. या पुस्तकासाठी ज्यांनी प्रस्तावना लिहिली ते नामवंत बालसाहित्यिक श्री एकनाथ आव्हाड सर व माझी ज्यांनी अनेक पुस्तके प्रसिध्द केली ते माझे प्रकाशक दिलीपराज यांचा मी निश्चितच ऋणी आहे.
-चंद्रसेन टिळेकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : विज्ञानोबा, तू माझा सांगाती