श्री. चंद्रसेन टिळेकरांचा `विज्ञानाची किमया` हा बालकवितांचा संग्रह वाचताच मनात आलं, हे छोटेखानी पुस्तक मुलांना वेगळ्याच विश्वाची सफर घडवणारं आहे. नेहमीच आढळणारे निसर्ग, प्राणी, पक्षी, फुलं, राक्षस, जादू, भुतं वगैरे हमखास विषय यात नाहीत. उलटपक्षी, या कवितांमधून विचारप्रवण, शंकांना भरपूर वाव देणारं, मनात प्रश्नांचं जाळ विणणारं, कुतूहल जागवणारं, औत्सुक्य वाढवणारं असं खूप काही खाद्य मुलांना मिळणार आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : विज्ञानाची किंमया आणि इतर बालकविता