पुस्तकाचे नाव : आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
- Category: Ideology
- Author: डॉ.आ.ह.साळुंखे
- Publisher: एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊस
- Copyright By: नीरज साळुंखे
- ISBN No.: 000000
₹180
₹200
1 Book In Stock
Qty:
`आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल`, या पुस्तकाची दुसरी आवृत्ती वाचकांच्या हाती देताना मला आनंद होत आहे. हे पुस्तक पहिल्यांदा `नवभारत` मासिकाचा जाने-फेब्रु-मार्च १९९४ चा अंक म्हणून वाईहून प्रकाशित झाले होते. प्रत्यक्षात तो अंक ऑक्टोबर १९९५ मध्ये प्रकाशित झाला होता. माझे मित्र श्री. अर्जुन देसाई या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करीत आहेत, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.पहिल्या आवृत्तीमधील बराच भाग वगळून ही आवृत्ती संक्षिप्त केली आहे. व्याकरण, काव्यशास्त्र वगैरे बाबतीतील विवेचन या आवृत्तीत घेतलेले नाही, तसेच प्रल्हाद, विरोचन, बळी वगैरे असुरांबद्दलचे विवेचन `बळीवंश` या पुस्तकात येणार असल्यामुळे या आवृत्तीतून वगळले आहे. इतरही काही भाग कमी केला आहे.वाचक नेहमीप्रमाणे या आवृत्तीचेही स्वागत करतील, असा मला विश्वास वाटतो.