२००६ साली लावलेला `शाहूंच्या आठवणी `रुपी वृक्षाचा आज वटवृक्ष झाला आहे. या चौदा वर्षांच्या काळात या पुस्तकाच्या ५० आवृत्त्या व दीड लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री झाली. या पुस्तकाचे स्वरुप अत्यंत सोपे व सहज असल्यामुळे शाहू चरित्र समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. पुस्तकाच्या वाचकांमध्ये जसा एखाद्या सामान्य कामगार, शेतकऱ्यांचा समावेश आहे तसेच उच्चशिक्षित वाचकांना, व्यवसायिकांना, गृहिणींना, विद्यार्थी या सर्व घटकांना पुस्तक प्रचंड आवडले. या पुस्तकाच्या वितरणासाठी मी कोल्हापूर ते जळगाव, कोकण ते मराठवाडा या विदर्भ वगळता सर्व महाराष्ट्राचा मोटरसायकलवरून दोन लाख कि. मी. चा प्रवास केला व वाचकांपर्यंत हे पुस्तक अत्यंत अल्प किमतीत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना अगदी वर्गापर्यंत जाऊन या पुस्तकाविषयी व शाहू चरित्राविषयी सांगितले आणि त्यांना परवडणाऱ्या किंमतीत हे पुस्तक उपलब्ध केले. या प्रवासात प्रचंड अनुभव मिळाले व छ. शाहू महाराजांविषयीचे प्रेम पहायला मिळाले. या प्रवासात शाळा, कॉलेजमध्ये मुक्काम करून प्रसंगी एक वेळ जेऊन निरंतर शाहू कार्य प्रसाराचा ध्यास घेतला व हे पुस्तक तळागाळापर्यंत पोहोचवले. या माझ्या प्रवासात अनेकांची मदत मला झाली. कित्येक संस्था,
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : शाहूंच्या आठवणी