आंबेडकरोत्तर कालखंडात ज्या लढाऊ चळवळींचा जनमानसावर प्रभाव राहिला त्यात दलित पॅंथर` या संघटनेला अधोरेखित करावेच लागते. गावखेड्यापासून महानगरापर्यंत सर्व पातळ्यांवर पँथरच्या छावण्या होत्या. कार्यकर्ते सक्रीय होते. रचनात्मक कार्यक्रम होते. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी संघटना म्हणून पथरचा लौकिक होता आणि सामान्य माणसात चळवळीच्या पातळीवर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात पॅंथरचे नेतृत्व यशस्वी झाले होते. एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करण्यात शीर्षस्थ नेत्यांप्रमाणेच सामान्य पैंथर कार्यकर्ताही तितकाच प्रभावशाली व सक्षम होता. डॉ. विठ्ठल शिंदे यांनी `दलित पँथर क्रांतिकारी नोंदी` या ग्रंथात दलित पॅंथरच्या उदयास्ताचा लेखाजोखा विस्ताराने मांडला आहे. गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्यापासून पँथरमधील सर्व थरातील घडामोडींवर त्यांनी सप्रमाण प्रकाशझोत टाकला आहे. पॅंथरच्या छोट्याशा छावणी मिटिंगच्या हँडबीलपासून ते आंदोलनानंतर प्रसिद्ध झालेल्या इतिवृत्तापर्यंतचे अनेक मूळ दस्तावेज डॉ. विठ्ठल शिंदे यांनी या ग्रंथात नोंदविले आहेत. दलित पंचरचा कालखंड जरी सीमित भासत असला तरी पँथरचा जनचळवळ म्हणून असलेला पट विस्तृत आहे. त्यामुळे एकाच ग्रंथात दलित पँथरच्या समग्र इतिहासाचा आढावा घेणे अशक्यप्राय आहे. ही मर्यादा विचारात घेतली तरी डॉ. विठ्ठल शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात केलेल्या `क्रांतिकारी नोंदी` अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पॅंथरच्या अस्तानंतर सामान्य कार्यकर्त्याची म्हणावी तशी दखल ना चळवळीने घेतली ना ग्रंथरुपात नोंदविली गेली, मात्र ही उणीव प्रस्तुत ग्रंथाने काही अंशी भरून काढली आहे. सामान्य कार्यकर्त्यांची यानिमित्ताने घेतलेली नोंद हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. डॉ. विठ्ठल शिंदे प्रारंभापासूनच मध्ये सक्रीय होते, त्यामुळे या ग्रंथातील नोंदी प्रत्यक्षदर्शी असून विश्वासार्ह आहेत. हा ग्रंथ दलित पँथरच्या इतिहास लेखनातील मैलाचा दगड ठरणार आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : दलित पॅंथर