पुस्तकाचे नाव : माझा गाव माझी माणसं
- Category: Literature
- Author: गोकुळ गायकवाड
- Publisher: Pustak Market Publication
- Copyright By: मीनाक्षी गोकुळ गायकवाड
- ISBN No.: 978-93-95187-66-4
2 Book In Stock
बालाघाट डोंगराच्या कुशीत वसलेलं, एक छोटस गाव, गिरगाव त्याचं नाव. चाळीस-पचास घरांचे गाव, वाडा- हुडा अथवा गढ़ी-माडी नसलेलं गाव, गवती छप्परांची, दगड मातीच्या भिंती असणारी लहान लहान घरं. गावच्या पाटलांनाही चौक असणारा वाडा नव्हता. म्हणजेच गावातील सर्वच गरीब शेतकरी, शेतमजूर मोलमजुरी करणारे गावचा संपूर्ण शिवार डोंगर दऱ्या खोया आणि माळरान, सुपिक बागायती जमीन नाही. सगळं दगड धोंड्याच मुरमाड बरहाचे रान, आगाताची पिक घेणारे, बाकी काम धंद्यासाठी पोटापाण्यासाठी परागंदा झालेली माणसं.गाव अगदीच अडवळणी आणि अति दुर्गम स्वातंत्र्यानंतर कितीतरी वर्षे येथे सुधारणेचं वारं फिरलचं नाही. जवळचं बाजार पेठेचं गाव म्हणजे खड़ ता जामखेड जि अहमदनगर साधारण ९-१० किलोमीटर दूर. शाळा दवाखाना आणि बाजारहटा याच गावावर अवलंबून ईट ता. भूम हे गाव ही १०-११ किलोमिटर अंतरावर दोन्ही गावाला जायला ना सडक ना चांगला रस्ता फक्त होती दगड धोंड्याची पायवाट, मागास आणि उपेक्षित गाव म्हणून लौकिक